



जय हिंद फाउंडेशन, अहिल्यानगर.

वृक्षलागवड आणि संवर्धन
अहिल्यानगर जिल्ह्यात १९,२०० झाडांची लागवड, त्यात ४,७०० वडाची झाडं —
"झाडे लावा, झाडे जगवा" हे आमचं ब्रीद.

पाणी आडवा, पाणी जिरवा
डोंगराळ भागात पाणपोईंचं नियोजन आणि
जलस्रोत वाढवण्यासाठी जलसंधारण उपक्रम.

मोफत आरोग्य शिबिरे
ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिरे,
आरोग्य जाणीवेसाठी नियमित आयोजन.

शालेय साहित्य वाटप
विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप करून शिक्षणासाठी प्रोत्साहन
आणि आर्थिक अडचणीत मदतीचा हात.
सैनिकांच्या सेवाभावातून समाजासाठी हिरवळ फुलवतोय!
जय हिंद फाउंडेशन, अहिल्यानगर ही फक्त एक संस्था नाही,
तर ती एक चळवळ आहे — जिथं निसर्ग, सैनिक आणि समाज एकत्र येतो.
आज आम्ही झाडं लावतो,
उद्या सावली देणारे लोक तयार करतो.
स्वच्छता असो, आरोग्य असो किंवा विद्यार्थ्यांची मदत —
आमचं प्रत्येक पाऊल सामाजिक बांधिलकीतून उगम पावलेलं आहे.
Mission
Vision
Values
सेवेतून समाज आणि निसर्ग घडवणे
जय हिंद फाउंडेशन, अहिल्यानगर चे प्रमुख ध्येय म्हणजे आजी-माजी सैनिकांना एकत्र आणून सामाजिक आणि पर्यावरणीय उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग वाढवणे.
वृक्षलागवड, जलसंधारण, आरोग्य शिबिरे, शालेय साहित्य वाटप, स्वच्छता आणि सामान्य नागरिकांच्या अडचणी सरकार दरबारी मांडणे
यामार्फत समाजात सकारात्मक आणि जबाबदार बदल घडवण्याची दिशा आम्ही ठेवतो.
हिरवळीतून शाश्वत समाज निर्माण करण्याची दिशा
एक समजूतदार, संवेदनशील आणि हिरवळ असलेला समाज घडवणे हा आमचा दृष्टीकोन आहे.
“झाडे लावा, झाडे जगवा” ही केवळ घोषणा नसून ती आमच्या कार्याची ओळख आहे. पर्यावरण रक्षण, सैनिकांचा सन्मान आणि समाजातील दुर्बल घटकांना सहाय्य देणं या तिन्ही आघाड्यांवर आम्ही सातत्याने
कार्य करत आहोत, जेणेकरून पुढच्या पिढ्यांसाठी एक सुरक्षित, हरित आणि समानतेवर आधारलेला समाज उभा करता येईल.
समर्पण. एकजूट. उत्तरदायित्व.
- समर्पण – आमच्या प्रत्येक उपक्रमामध्ये निस्वार्थ भावनेनं काम करण्याची वृत्ती.
एकजूट – सैनिक, युवक आणि नागरिक यांना एकत्र आणून एक मजबूत सामाजिक जाळं तयार करणे.
उत्तरदायित्व – पर्यावरण, समाज आणि भविष्यासाठी आपण घेतलेली प्रत्येक कृती ही जबाबदारीने पार पाडणे.
Watch Video

तुमच्या मनातील प्रश्न, आमच्या कडून उत्तरे
जय हिंद फाउंडेशनचा प्रमुख उद्देश काय आहे?
जय हिंद फाउंडेशनचा उद्देश म्हणजे आजी-माजी सैनिकांना एकत्र आणणे, पर्यावरण रक्षणासाठी वृक्षलागवड व संवर्धन करणे, आणि सामाजिक उपक्रमांद्वारे ग्रामीण भागात सकारात्मक बदल घडवणे.
तुम्ही झाडांच्या संवर्धनासाठी काय करता?
आत्तापर्यंत आम्ही १९,२०० पेक्षा अधिक झाडांची लागवड केली असून त्यात ४,७०० वडाच्या झाडांचा समावेश आहे. आम्ही फक्त झाडं लावत नाही, तर त्यांचं संगोपन, पाण्याची सोय, आणि संरक्षणही करतो.
जय हिंद फाउंडेशनमध्ये मी स्वयंसेवक म्हणून कसं सहभागी होऊ शकतो?
कोणताही पर्यावरणप्रेमी किंवा समाजसेवक आमच्याशी संपर्क करून स्वयंसेवक म्हणून जोडू शकतो. आपण वृक्षलागवड, जनजागृती, शिबिरे आणि इतर सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊ शकता.
तुमच्या दृष्टीकोनात सैनिकांचं स्थान काय आहे?
आजी-माजी सैनिक हे आमच्या कार्याचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या अनुभवाचा उपयोग सामाजिक उपक्रमांसाठी केला जातो आणि त्यांचं पुनर्मूल्यांकन व सन्मान हे आमचं कर्तव्य आहे.
लोकांचं आमच्याविषयी मत
हिरवळ घडवणाऱ्या आमच्या कार्याने अनेकांच्या मनात विश्वास आणि प्रेरणा निर्माण केली आहे.
"झाड लावणं हे केवळ एक सामाजिक कर्तव्य नाही, तर ते अध्यात्मिक साधनेसारखं आहे.
जय हिंद फाउंडेशन, अहिल्यानगर यांनी जे वृक्षसंवर्धनाचं कार्य केलं आहे, ते अत्यंत प्रेरणादायी आहे.
१९,२०० पेक्षा जास्त झाडं आणि ४,७०० वडाची लागवड म्हणजे निसर्गाशी जोडलेली भक्तीच आहे.
या कार्यात सैनिक बांधवांना सहभागी करून घेणं ही या संस्थेची अनोखी देणगी आहे."

"खेड्यांचा विकास हा फक्त रस्ते आणि इमारतींनी होत नाही, तर पर्यावरणाच्या रक्षणानेही होतो.
जय हिंद फाउंडेशनने आजी-माजी सैनिकांशी मिळून जे झाडांची लागवड व संवर्धन केलं,
ते खरं म्हणजे गाव विकासाच्या दृष्टीने एक आदर्श उदाहरण आहे.
या संस्थेने समाजात पर्यावरणाची जाणीव निर्माण केली आहे आणि लोकसहभाग वाढवला आहे."

"जे काम झाडं लावून, समाजात पर्यावरणाचे महत्त्व पटवून दिलं जातं,
ते खरोखरच लोकशिक्षण आणि लोककल्याणाचं उत्तम उदाहरण आहे.
जय हिंद फाउंडेशनचं कार्य हे एक सilent movement असून, त्यामागची तळमळ फार मोठी आहे.
झाडं लावणं, वाचवणं आणि त्यासाठी जनतेला जोडणं हे फार अवघड आहे, पण त्यांनी ते करून दाखवलं."













