पर्यावरण जपणं, समाज जोडणं, परिवर्तन घडवणं
जय हिंद फाउंडेशन, अहिल्यानगर यांचा दृष्टीकोन म्हणजे निसर्गाच्या रक्षणासोबत समाजात एकात्मता, संवेदनशीलता आणि उत्तरदायित्व निर्माण करणे.
आमचा उद्देश महाराष्ट्रातील प्रत्येक गाव हिरवळीत न्हालेलं असावं, प्रत्येक नागरिक पर्यावरणाबाबत जागरूक असावा, आणि समाजातील प्रत्येक घटकासाठी न्याय व सन्मान मिळवून द्यावा हा आहे.
आम्ही वृक्षलागवड, स्वच्छता, पाणी संकलन, शिक्षण, आरोग्य आणि सेवा यांद्वारे समाजात शाश्वत आणि सकारात्मक बदल घडवण्याची दिशा ठरवली आहे.
“झाडे लावा… झाडे जगवा” ही आमची घोषणा नव्हे, तर ती आमची शपथ आहे.
झाडांची लागवड व संवर्धन
वृक्षलागवड एकूण ठिकाणे
लावलेले वृक्ष प्रकार
वृक्षलागवड एकूण गावे
सैनिकांचं संघटन, पर्यावरणाचं संवर्धन, आणि समाजासाठी समर्पित उपक्रम
जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशन, अहिल्यानगर ही संस्था ०१/०१/२०१७ पासून कार्यरत आहे.
संस्थेचा उद्देश आजी-माजी सैनिकांना एकत्र आणून वृक्षलागवड, सामाजिक भान,
स्वच्छता, पाणी संवर्धन, आणि विविध समाजोपयोगी उपक्रम राबवणे हा आहे.
.
.
.
वृक्षलागवड, संवर्धन आणि समाजहितासाठी चाललेली अखंड चळवळ
जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशन, अहिल्यानगर ची स्थापना ०१/०१/२०१७ रोजी करण्यात आली. या संस्थेचा प्रमुख उद्देश आजी-माजी सैनिकांना एकत्र आणून सामाजिक कार्यात सहभागी करणे आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात १९,२०० झाडांचे वृक्षारोपण व संवर्धन करण्यात आले आहे,
त्यामध्ये ४,७०० वडाच्या झाडांचा समावेश असून, ही मोहीम आजही सातत्याने सुरू आहे.
आपलं एक पाऊल, निसर्गासाठी श्वास!
सामूहिक वृक्षलागवड उपक्रमात नागरिक, आजी-माजी सैनिक आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले. सर्वांनी मिळून पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेतला आणि निसर्गाशी नातं जपलं.हे दृश्य आमच्या दृष्टीकोनाचं जिवंत उदाहरण आहे – समाज, निसर्ग आणि सैनिक यांचं एकत्रित योगदान.
तुमचंही या चळवळीत स्वागत आहे – चला, झाडं लावूया आणि हिरव्या भविष्यासाठी एकत्र उभं राहूया!
तुमच्या मनातील प्रश्न, आमच्या कडून उत्तरे
जय हिंद फाउंडेशनचा प्रमुख उद्देश काय आहे?
जय हिंद फाउंडेशनचा उद्देश म्हणजे आजी-माजी सैनिकांना एकत्र आणणे, पर्यावरण रक्षणासाठी वृक्षलागवड व संवर्धन करणे, आणि सामाजिक उपक्रमांद्वारे ग्रामीण भागात सकारात्मक बदल घडवणे.
तुम्ही झाडांच्या संवर्धनासाठी काय करता?
आत्तापर्यंत आम्ही १९,२०० पेक्षा अधिक झाडांची लागवड केली असून त्यात ४,७०० वडाच्या झाडांचा समावेश आहे. आम्ही फक्त झाडं लावत नाही, तर त्यांचं संगोपन, पाण्याची सोय, आणि संरक्षणही करतो.
जय हिंद फाउंडेशनमध्ये मी स्वयंसेवक म्हणून कसं सहभागी होऊ शकतो?
कोणताही पर्यावरणप्रेमी किंवा समाजसेवक आमच्याशी संपर्क करून स्वयंसेवक म्हणून जोडू शकतो. आपण वृक्षलागवड, जनजागृती, शिबिरे आणि इतर सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊ शकता.
तुमच्या दृष्टीकोनात सैनिकांचं स्थान काय आहे?
आजी-माजी सैनिक हे आमच्या कार्याचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या अनुभवाचा उपयोग सामाजिक उपक्रमांसाठी केला जातो आणि त्यांचं पुनर्मूल्यांकन व सन्मान हे आमचं कर्तव्य आहे.
